Bus Overturned Tamhani Ghat: रायगडमधील ताम्हणी घाटात बस उलटून दोन ठार, 55 जखमी

या अपघातात दोघे जण ठार तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Bus Overturned Tamhani Ghat (Photo Credits: ANI/X)

रायगड जिल्ह्यातील ताम्हणी घाटात बस उलटून शनिवारी (30 डिसेंबर) अपघात घडला. या अपघातात दोघे जण ठार तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे, अशी माहिती रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. दरम्यान, हा अपघात माणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अपघाताचे कारण अद्याप पुढे आले नाही.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)