Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातामागे Road construction कारण नाही - Devendra Fadnavis
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्मार्ट सिस्टिम लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही यंत्रणा लागू होईपर्यंत मानवी हस्तक्षेप करावा लागणार आहे.
समृद्धी महामार्गावर आज (1 जुलै) अजून एक भीषण अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हलसच्या बसला पहाटे अपघात झाला आहे. यामध्ये 25 जण जागीच जळून ठार झाले आहेत. दरम्यान या अपघाताविषयी माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी 'रोड कन्सट्र्क्शन' हे समृद्धी महामार्ग वरील बसच्या अपघाताचे कारण नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मानवी चूका किंवा वाहनांमधील बिघाडामुळे हे अपघात होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत भविष्यात चालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. दरम्यान डिझेलची टाकी फुटल्याने बस पेटल्याचेही ते म्हणाले आहेत. Buldhana Accident: बुलढाण्यातील बस अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर .
पहा देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)