Bombay High Court कडून रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल; मुंबई, नवी मुंबई सह 6 पालिका आयुक्तांना समन्स जारी

मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबईकरांसाठी रस्त्यावरील खड्डे ही समस्या आहे. यावरून अनेक राजकीय पक्षांनीही आवज उठवला आहे परंतू मागील कित्येक वर्षात त्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. काल यावरूनच मुंबई उच्च न्यायालयाने 6 पालिका आयुक्तांना समन्स पाठवला आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे. सध्या या खड्ड्यांमुळे अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. BMC: मुंबईमध्ये 2022 पासून खड्ड्यांच्या 14,000 हून अधिक तक्रारी प्रलंबित; विरोधकांकडून BMC वर टीका .

 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now