Bomb Threat at Shaniwar Wada: पुण्यातील शनिवाडा मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या कॉलने खळबळ; बॉम्बस्कॉड कडून शोधकार्य सुरू
पोलिस नियंत्रण कक्षाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी पुण्यातील 18 व्या शतकातील प्रतिष्ठित शनिवार वाडा रिकामा करण्यात आला.
पुण्याचं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि शहराची ओळख असलेल्या शनिवार वाडा मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या बातमीने खळबळ पसरली आहे. या भागात सध्या बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले असून श्वान पथकाच्या मदतीने देखील सारा परिसर तपासला जात आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक इथे आले होते मात्र आता सारा परिसर रिकामा करून शनिवार वाडा तपासला जात आहे. एक वेबावरस बॅग ठेवली असल्याची माहिती कॉलच्या माध्यमातून दिली होती आता त्याचा शोध सुरू आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार अद्याप कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही. Indigo Bomb Threat: इंडिगोच्या चेन्नई-मुंबई विमानात बॉम्बची धमकी, विमानाचे इमर्जन्सी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग; सर्व 172 प्रवासी सुरक्षित .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)