Mumbai: बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याच्या भीतीमुळे उडाळी खळबळ
महापालिकेच्या इलेक्ट्रिक पुरवठा आणि वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्ट बस मध्ये एक संशयास्पद बॅग असल्याचे दिसून आले. एनसीपीए जवळ बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्याने याची तातडीने माहिची पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली.
महापालिकेच्या इलेक्ट्रिक पुरवठा आणि वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्ट बस मध्ये एक संशयास्पद बॅग असल्याचे दिसून आले. एनसीपीए जवळ बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्याने याची तातडीने माहिची पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर बॉम्ब शोध आणि नाशक पथक घटनास्थळी पोहटले. त्यांनी तेथे संशायस्पद बॅगची पहाणी केली. याबद्दल टाइम्स ऑफ इंडिया यांनी वृत्त दिले आहे.
बॅगमध्ये कारपेंटरचे सामान असल्याचे दिसून आले. तरीही बसची व्यवस्थिती पाहणी केली गेली आणि तेथे बॉम्ब आढळला नसल्याचे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर बेस्ट पुन्हा डेपोत पाठवली गेली. दरम्यान, यापूर्वी सुद्धा दहशतवाद्यांकडून हल्ला करणाऱ्यासाठी बेस्टला निशाणा केल्याचे ही समोर आले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)