BJP on Sanjay Raut Press Conference: संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार, निलेश राणे, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक BJP नेत्यांच्या प्रतिक्रिया

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात मोठी पत्रकार परिषद पार पडली

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात मोठी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी भाजप, ईडी, सीबीआय, किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजपच्या एकूण 5 नेत्यांवर हे आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील सरकार पडण्याचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा मुलुंडचा दलाल असा उल्लेख केला. तसेच उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

त्यानंतर यावर अनेक भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खोला पहाड निकला चूहा’ अशी ही पत्रकार परिषद असल्याचे अनेक भाजप नेत्यांनी सांगितले. संजय राऊतांची पत्रकार परिषद ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवणारी होती अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. संजय राऊतांनी कारवाईला घाबरून सौदेबाजी केली असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही असा घणाघातसुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now