विधानसभेत अजित पवार एन्ट्री करताना भाजप आमदारांची शरद पवारांच्या निषेधात घोषणाबाजी (Watch Video)

काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार विरोधकांना संपण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला होता.

शरद पवारांच्या निषेधात घोषणाबाजी (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप नेत्यांचे विधानसभेबाहेर निदर्शन सुरु आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशात काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार विरोधकांना संपण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत, रचलेल्या कटाचे 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला ‘पेनड्राईव्ह' सादर केला. त्यावर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय असे रेकॉर्डिंग शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. या पार्श्वभुमीवर विधानसभेत अजित पवार एन्ट्री करताना भाजप आमदारांनी शरद पवारांच्या निषेधात घोषणाबाजी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)