भाजप नेते Tajinder Pal Singh Bagga यांची CM Uddhav Thackeray यांच्याविरुध्द तक्रार; कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे दक्षिण मुंबईतील शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडले. आज संध्याकाळी उशिरा ते त्यांच्या उपनगरातील वांद्रे येथील खाजगी 'मातोश्री' बंगल्यामध्ये राहण्यास गेले.

Tajinder Pal Singh Bagga (संग्रहित संपादित प्रतिमा)

भाजपचे युवा राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात, कोविड-19 नियमांचे उल्लंघन करत लोकांना भेटल्याबद्दल ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवत, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे दक्षिण मुंबईतील शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडले. आज संध्याकाळी उशिरा ते त्यांच्या उपनगरातील वांद्रे येथील खाजगी 'मातोश्री' बंगल्यामध्ये राहण्यास गेले. अधिकृत अपडेटनुसार ठाकरे हे कोविड-19 पॉझिटिव्ह आहेत. वर्षा ते मातोश्री या प्रवासादरम्यान ते अनेक लोकांच्या संपर्कात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now