Watch: 'भाजप म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही'- Uddhav Thackeray यांचा BJP वर निशाणा

आज उत्तर भारतीय जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष बाण हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील हक्काबाबत सुनावणी झाली होती. त्त्यानंतर आता याबाबत निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला.

या निर्णयानंतर उद्धव ठाकरे सतत भाजपवर हल्ले करत आहेत. आजही उत्तर भारतीय जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आम्ही आधीही हिंदुत्त्ववादी होतो. आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे. मी हिंदुत्व काहीही सोडणार नाही. मी फक्त भाजपला सोडले आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्या वडिलांच्या भाषेत सांगायचे तर राष्ट्रीयत्व हेच खरे हिंदुत्व. आमचे हिंदुत्व देशाशी जोडले गेले आहे.’

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement