Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी 'मातोश्री'वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, Watch
त्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. यापूर्वी नितीश यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती.
Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री आणि RJD नेते नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री, RJD नेते तेजस्वी यादव यांनी आज UBT नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईतील 'मातोश्री' येथे भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जनता दल युनायटेड (JDU) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर आणि सहकार मंत्री संजय कुमार झा हे देखील नितीश कुमार यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत विरोधी ऐक्याबाबत चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आजकाल विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. यापूर्वी नितीश यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. (हेही वाचा - Political Leaders Reaction: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; संजय राऊत, नरहरी झिरवळ यांच्यासह राजकीय नेत्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)