BEST Bus Strike: घाटकोपर, मुलुंड आगारामध्ये कंत्राटी कर्मचारी संपावर; वाहतूक सेवा विस्कळीत

पगारवाढीच्या मागणीवरून मुंबईमध्ये मुलुंड आणि घाटकोपर बस स्थानकामध्ये कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.

BEST Bus प्रतिकात्मक प्रतिमा | Twitter

मुंबई मध्ये घाटकोपर, मुलंड आगारामध्ये आज (2 ऑगस्ट) कंत्राटी कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाला सुरूवात केली आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. कामावर निघालेल्या अनेक मुंबईकरांना या अचानक पुकारल्या गेलेल्या संपाचा फटका बसला आहे. दरम्यान हा संप केवळ मुलुंड, घाटकोपर डेपो पुरताच मर्यादित आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)