Beed Shocker : कारचा जरा धक्का लागला अन्... तलवारी, काठ्या घेऊन टोळक्याचा वाहन चालकावर जीवघेणा हल्ला; बीडमधील थरारक व्हिडीओ (Watch Video)
कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून बीडमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षरश: ४० ते ५० जणांच्या टोळक्याने एका वाहन चालकाच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याची गाडीची फोडली.
Beed Shocker : कारचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून बीडमध्ये दोन गटात (gang ) तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. तलवारी(swords ), काठ्यांसह (sticks )कार चालकाला घरात घुसून दगडफेक करत मारहाण (beatn up car driver ) करण्यात आली. त्यानंतर त्याच्या गाडीची तोडफोड (car vandalise) करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यातून बीड शहरात गुंडांना (Beed Crime) पोलिसांचा धाक राहीला नसल्याच दिसत आहे. नगर रोडवरील ग्रामसेवक कॉलनी आणि पंढरी कॉलनीमध्ये मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रात्री झालेल्या राड्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हेही वाचा:Pune Crime: रोज जेवणाला नावं ठेवतो म्हणून रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला, पत्नीवर गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)