Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू
शिंदे याला पोलीस कोठडीत घेत असताना त्याने गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर (Badlapur) येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) मधील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, शिंदे याला पोलीस कोठडीत घेत असताना त्याने गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना, त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी शिंदेने एकूण तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी एका पोलिसाला लागली, दोन गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात अक्षय शिंदेला दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदेला लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. बदलापूर येथील शाळेत बलात्काराशिवाय अक्षय शिंदे याच्यावर बलात्काराचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयाकडून त्याची कोठडी मिळवली होती. त्याला कारागृहातून परत पोलीस कोठडीत नेत असताना ही घटना घडली. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा)
बदलापूर आदर्श शाळा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)