Baba Siddiqui Murder Case: वांद्रे परिसरामध्ये Zeeshan Siddiqui च्या कार्यालयाजवळ एका पार्क केलेल्या कारच्या टायर मधून अजून एक शस्त्र जप्त

झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस जवळ पार्क केलेल्या एका कारच्या टायर मध्ये शस्त्र लपवले होते.

(File Image)

12 ऑक्टोबरच्या रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर आता आरोपींची कसून चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये आता झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस जवळ पार्क केलेल्या एका कारच्या टायर मध्ये शस्त्र लपवले होते. मुंबई क्राईम ब्रांच ने ते शस्त्र जप्त केले आहे. दरम्यान मुंबई क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, ही कार काही दिवसांपूर्वी तेथे पार्क केली होती तसेच ही कार संपूर्णपणे झाकलेली होती.

झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाजवळून अजून एक शस्त्र जप्त

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement