Ajit Pawar Birthday: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा अजित पवार यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
बुके, जाहिरातींवर खर्च न करता निधी इर्शाळवाडी पुन्हा उभारणीसाठी द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.
रायगड मध्ये काल मध्यरात्री इर्शाळवाडी भागात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये काही कुटुंब दरडीच्या मलब्याखाली दबली गेली आहे. त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्र शासन सध्या मदतीला लागले आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला 22 जुलै दिवशी होणारं वाढदिवसाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. बुके, जाहिरातींवर खर्च न करता निधी इर्शाळवाडी पुन्हा उभारणीसाठी द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बर्थ डे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित उत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचे त्यांचे तेव्हा आवाहन होते. नक्की वाचा: संकटात असणार्या शेतकरीच्या मागे उभं राहत कृषमंत्री Dhananjay Munde यांचा आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)