नागरिकांनो लक्ष द्या! आता वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक; परिवहन विभागाचे आवाहन

कार्यपद्धतीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 2 फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात येणाऱ्या रेट्रो फिटेड वेग नियंत्रक उपकरणाच्या माहितीचे वाहन प्रणालीशी संलग्नीकरण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

Mumbai Traffic | Representational Image (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका आणि पोलीस विभागाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार अशा वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून काही प्रकाराच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र काढतांना वाहनधारकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासर्व तक्रारींचे निवारण करण्याकरिता कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यपद्धतीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 2 फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात येणाऱ्या रेट्रो फिटेड वेग नियंत्रक उपकरणाच्या माहितीचे वाहन प्रणालीशी संलग्नीकरण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. अशा उपकरणांवर सोळा अंकी युआयडी क्रमांक नमूद करण्याचे बंधनकारक केले आहे. (हेही वाचा: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता; पुढील सहा महिन्यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना निर्माण होऊ शकतात मुलभूत सुविधा)

वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)