Amravati: बलात्कार पीडित अल्पवयीन गर्भवती मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीला अटक, गुन्हा दाखल

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईमधील साकी नाका येथे घडलेली बलात्काराची घटना ताजी असताना आता अजून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही मुलगी 17 वर्षाची असून एका व्यक्तीने तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ही मुलगी 7 महिन्याची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे. आता या मुलीने आपले जीवन संपवले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)