Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणा पराभवाच्या छायेत, बळवंत वानखेडेंची 28 हजार मतांनी आघाडी

Photo Credit- facebook

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदार संघात बळवंत वानखेडे आणि नवनीत राणा यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. आघाडी-पिछाडीच्या खेळामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana)आता पराभवाच्या छायेत गेल्या आहेत. नवनीत राणा मोठ्या फरकाने पिढाडीवर आहेत. कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे (Balwant Wankhede)यांनी 28 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. अमरावती मतदारसंघ सुरूवातीपासून चर्चेत आला आहे. बच्चूकडू यांनी अमरावती (Amravati)त नवनीत राणा याचा प्रचार करण्यास नकार दिल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती. त्याचे पडसाद म्हणून नवनवीत राणा यांची खासदारकीची खूर्ची आता धोक्यात आली आहे. (हेही वाचा:Amravati Loksabha Election 2024: अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा 10 हजार मतांनी पुढे, बळवंत वानखडे पिछाडीवर )

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now