Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला आग, मुंबईतील दादर टर्मिनलवरील घटना
अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे.
Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोसमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली. (हेही वाचा- माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2024 10:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

