Amol Mitkari's Car Vandalized: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची MNS कार्यकर्त्यांकडून तोडफोड; राज ठाकरेंवर केली होती टीका (Watch Video)

मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला.

Amol Mitkari's Car Vandalized

Amol Mitkari's Car Vandalized: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. येथील पूरग्रस्त नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांवर भाष्य करू नये, असेही मिटकरी म्हणाले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला असून, त्यामध्ये गाडीच्या काचेही तोडफोड झाल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Supreme Court: अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now