IPL Auction 2025 Live

Amol Kirtikar Khichdi Scam Case: अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ, खिचडी घोटाळा प्रकरणात (ED) ईडीकडून पुन्हा समन्स

कोविड १९ खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनायला) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवसेना (युबीटी) नेते अमोल कीर्तिकर यांना नवीन समन्स जारी केला आहे.

Amol Kirtikar | Twitter

Amol Kirtikar Khichdi Scam Case:  लोकसभा निवडणूकीच्या पूर्व संध्येला अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोविड- 19 खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनायला) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवसेना (युबीटी) नेते अमोल कीर्तिकर यांना नवीन समन्स जारी केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आहे. महाविकास आघाडी (MVA) सरकारने कोविड-19 महामारीच्या काळात अडकलेल्या हजारो स्थलांतरितांना पौष्टिक आहार देण्याचे कंत्राट दिले होते. MVA सरकार पाडल्यानंतर, EOW ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 6.37 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर आणि सुनील कदम यांच्यासह अनेक SS (UBT) नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी बीएमसी अधिकारी आणि कॅटरिंग कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.(हेही वाचा- सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)