Sujay Vikhe Patil's Death Threat: सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूकीचा धुराळी सगळीकडे उडाला आहे. ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाले आहेत.

Sujay Vikhe Patil's Death Threat: सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया
Sujay Vikhe Patil PC TWITTER

Sujay Vikhe Patil's Death Threat: लोकसभा निवडणूकीचा धुराळी सगळीकडे उडाला आहे. ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्यात राजकारणातील आघाडीचे नेते सुजय विखे पाटील यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा ऑडिओ क्लिप कामोठेतील सभेत लावण्यात आले आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगर येथील प्रतिनिधीत्व करतात. (हेही वाचा- पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, 'विकसित भारत' पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, ऑडिओ क्लिपमध्ये शिव्या देणारी व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे.  ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायचीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऑडिओनंतर राजकारण एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरु असतानाच सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याचा एक ऑडिओ क्लिप समोर आला आहे. ऑडिओ क्लिपनुसार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचं स्पष्ट बोलल जात आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओनंतर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. ४ जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार,हे स्टॅम्प पेपरवर लिहून द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).