Amit Shah Pune Visit: विधानसभा निवडणुकीबाबत अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; पुण्यात पक्षाच्या बैठकीला संबोधित करू शकतात

आम्ही अमित शहा यांना या बैठकीला संबोधित करण्याची विनंती केली असून, त्यांनी पुण्यात येण्याचे मान्य केले आहे.

Amit Shah | Twitter

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा जुलैमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह 14 जुलै रोजी पुण्यात पक्षाच्या बैठकीला संबोधित करू शकतात. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ही माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘भाजपच्या पुण्यातील बैठकीला पक्षाचे सुमारे 4,500 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आम्ही अमित शहा यांना या बैठकीला संबोधित करण्याची विनंती केली असून, त्यांनी पुण्यात येण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ही बैठक महत्त्वाची आहे.’ या वर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबतच काँग्रेस नेतृत्वानेही तयारी सुरू केली आहे. या आठवड्यात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटच्या नेत्यांची बैठक घेतली. (हेही वाचा: Delhi Liquor Policy Case: अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; दिल्ली दारू धोरण प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)