Amit Shah Offers Prayers at Mahalaxmi Temple: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात; महालक्ष्मी मंदिरात केली पूजा (Video)

महायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अमित शाह कोल्हापूर येथे दाखल झाले आहेत.

Amit Shah Offers Prayers at Mahalaxmi Temple

Amit Shah Offers Prayers at Mahalaxmi Temple: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या मंदिरात पूजा केली. महायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह काल रात्री उशिरा कोल्हापूर येथे दाखल झाले. अमित शाह यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. अंबाबाईचे दर्शन घेऊन, नेत्यांसोबत बैठक घेऊन शहा पुढील प्रवासासाठी रवाना झाले. (हेही वाचा: Extortion Case: मनसे नेते Avinash Jadhav यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; सोने व्यापाऱ्याकडे मागितली 5 कोटींची खंडणी)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)