Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर
या व्हिडिओमध्ये, अमित शहा केंद्रात पुढील सरकार बनताच एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले जाईल, असे म्हणताना दिसत आहे. मात्र अमित शहा आपल्या मूळ भाषणात असे काहीही बोलले नव्हते.
Amit Shah Deepfake Video Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 'डीपफेक' व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस (युथ) च्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई भाजपचे नेते प्रतीक कर्पे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांचे पथक याचा तपास करत आहे. अमित शहा यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला होता, जो खोटा होता. या व्हिडिओमध्ये, अमित शहा केंद्रात पुढील सरकार बनताच एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले जाईल, असे म्हणताना दिसत आहे. मात्र अमित शहा आपल्या मूळ भाषणात असे काहीही बोलले नव्हते.
आता हाच छेडछाड केलेला व्हिडिओ शेअर केल्याने महाराष्ट्र काँग्रेस (युथ) या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे, या प्रकरणी इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना 1 मे रोजी चौकशीसाठी दिल्लीत बोलावले आहे. रेड्डी यांनीदेखील 'X' वर हा व्हिडिओ शेअर केला होता. (हेही वाचा: Amit Shah's Edited Video Case: अमित शाहच्या संपादित व्हिडिओ प्रकरणी रेवंत रेड्डी यांना समन्स)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)