Amboli Ghat Viral Video: इकोच्या टपावर चढून तरूणांची हुल्लडबाजी; व्हिडिओ वायरल
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीत बेफिकीर पर्यटकही अनेक गोष्टींचा विचका करतात. आंबोली घाटातील अशीच एक घटना समोर आली आहे.
'महाराष्ट्राचे चेरापुंजी' ओळख असलेल्या आंबोली घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलतं. धुके आणि हिरवळ पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु पर्यटकांच्या वाढत्या गर्दीत बेफिकीर पर्यटकही अनेक गोष्टींचा विचका करतात. कर्नाटकातील तरुणांच्या एका गटाने मुख्य धबधब्याजवळ अरुंद रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी थांबवून, मोठ्या आवाजात गाणी वाजवून, चालत्या गाड्यांवर नाचून आणि ओरडून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला, ज्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिकांना मोठी गैरसोय झाली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुण पुढे जात असताना गाडीवर नाचत हुल्लडबाजी करताना दिसत आहे. नक्की वाचा: देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई; पावसाळ्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय.