Alandi Shocker: आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार; संस्थाचालकाच्या आरोपी नातेवाईकाला अटक

अहवालानुसार, बारा वर्षे वयाच्या दोन मुलांवर संस्थाचालकाच्या मेव्हण्याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलांची याची माहिती पालकांना व संस्थाचालकाच्या पत्नीला दिली. मात्र तिने यावर काहीही कारवाई केली नाही.

Arrest | Representative Image (Photo Credit: PTI)

आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी ही घटना घडली. महत्वाचे म्हणजे हे अत्याचार संस्थाचालकाच्या मेव्हण्याने केले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. पिंपरी चिंचवडचे डीसीपी शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. अहवालानुसार, बारा वर्षे वयाच्या दोन मुलांवर संस्थाचालकाच्या मेव्हण्याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलांची याची माहिती पालकांना व संस्थाचालकाच्या पत्नीला दिली. मात्र तिने यावर काहीही कारवाई केली नाही. तिने ताबडतोब पोलिसांना याची माहिती देणे अपेक्षित होते, मात्र तसे घडले नाही. यामुळे आता तिलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. या दोघांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील अजून एक आरोपी हा संस्थेतील शिक्षक आहे. (हेही वाचा; Vasai Crime: कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्याकडून बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरू)

आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now