PMRDA चा मोठा निर्णय, आळंदी-चऱ्होली रस्त्यामुळे बदलणार पुण्याच्या 'या' भागाचा चेहरामोहरा

पुणे महानगराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पीएमआरडीएकडून आळंदी मर्कळ रस्ता ते चऱ्होलीमार्गे आळंदी रस्ता या दोन हजार मीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. गुणवत्तापूर्ण रस्ते विकासाला प्राधान्य देत, परिसरातील वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हे काम पुढे नेले जात आहे.

Road Safety | Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

पुणे महानगराच्या पायाभूत सुविधांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आळंदी मर्कळ रस्ता ते चऱ्होलीमार्गे आळंदी रस्ता या सुमारे दोन हजार मीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर असून, या भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.

आळंदी-चऱ्होली मार्गाचे हे काम PMRDAच्या 100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 'चाकण डी-क्लॉग वर्क' या व्यापक योजनेचा भाग आहे. या योजनेअंतर्गत चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुमारे सतरा किलोमीटर लांबीच्या सात प्रमुख रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येत आहे. यामध्ये कुरुळी फाटा ते निघोजे आणि चऱ्होली खुर्द ते आळंदी (मर्कळ रोड) या मार्गांचाही समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement