Akola: झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकून तरुणीचा मृत्यू; अकोला येथील घटना

अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याती रिधोरा (Ridhora) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपाळ्यावर झोका घेता घेता झोक्याची दोरी गळ्यात अडकून एका तरुणीला फास लागला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. कल्याणी दिपक पोटे (Kalyani Deepak Pote) असे या तरुणीचे नाव आहे. ती 21 वर्षांची होती.

Akola: झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकून तरुणीचा मृत्यू; अकोला येथील घटना
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याती रिधोरा (Ridhora) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपाळ्यावर झोका घेता घेता झोक्याची दोरी गळ्यात अडकून एका तरुणीला फास लागला. या घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. कल्याणी दिपक पोटे (Kalyani Deepak Pote) असे या तरुणीचे नाव आहे. ती 21 वर्षांची होती. कल्याणी डी.एडचे शिक्षण घेत होती. ज्या पद्धतीने कल्याणी पोटे हिचा मृत्यू झाला तो प्रकार पाहून आणि ऐकुन तिच्या कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला आहे. परिसारत तिच्या मृत्यूची जोरदार चर्चा सुरु आहे.

झोपाळ्याच्या दोरीचा फास गळ्यात अडकल्यांनतर कल्याणी हिला सावरायची संधीच मिळाली नाही. गळ्यात अडकलेल्या दोरीचा झटका बसल्याने तिच्या गळ्याला जबरी मार लागला. त्याच अवस्थेत ती बराच काळ पडून होती. धक्कादायक म्हणजे तिची अवस्था कोणाच्याच लक्षात आली नाही. वेळीच मदत झाली असती तर कदाचित कल्याणीचे प्राण वाचले असते. कल्याणीची आई काही कामसाठी घराच्या गच्चीवर गेली होती. तर वडील बाहेरगावी गेल्याने गैरहजर होते. त्यामुळे गळ्यात दोर अडकलेल्या अवस्थेत असलेल्या कल्याणीच्या मदतीला कोणीच आले नाही. (Shocking! आई-मुलाच्या नात्याला काळिमा; सतत रडते म्हणून आईने आपल्या 27 दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटून मारून टाकले)

गच्चीवरील काम आटोपून आई जेव्हा खाली आली तेव्हा घरातील दृश्य पाहून तिला धक्का बसला. तिने आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने कल्याणीला दवाखाण्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापर्वीच मृत घोषीत केले. झोपाळ्यातील उशी सरकली आणि ती खाली पडली. त्यातच तिला दोरीचा फास लागला. तिला जर वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित तिचे प्राण वाचले असते, अशी चर्चा परिरात सुरु आहे. तुरुणपणी आलेल्या अकाली मृत्यूमुळे कल्याणीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात शोककळा पसरली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2021 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).