Ajit Pawar On Nawab Malik in Mahayuti: महायुतीत नवाब मलिक नको म्हणणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवार गटाने दिली पहिली प्रतिक्रिया!
सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर मांडताना 'त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही.' असं म्हटलं आहे.
महायुतीत नवाब मलिक नको असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारा अजित पवारांना सांगितलं आहे. 'त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही' असे ते म्हणाले आहेत. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय प्रतिक्रियांची चर्चा सुरू झाली आहे. यावर सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर मांडताना 'त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे' असं म्हटलं आहे. अजित पवारांनीही तटकरेंचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र .
पहा ट्वीट
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2023 09:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

