कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ; Rohit Pawar यांनी केला जाहीर निषेध

आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत एक ट्वीट केले आहे

NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत अतिशय गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्तार यांच्यावर कडाडून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. आता आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात- 'कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?'

'सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक 'बदला' घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या. #जाहीर_निषेध'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)