Aaditya Thackeray vs Eknath Shinde: आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे बैठकीत आमनेसामने; शिंदे आल्यानंतर सर्वजण उठले पण आदित्य ठाकरेंनी काय केलं? तुम्हीचं पहा

बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहताना दिसले.

Aditya Thackeray and Eknath Shinde face to face (फोटो सौजन्य - फेसबुक)

Aaditya Thackeray vs Eknath Shinde: आज एका बैठकीदरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमनेसामने दिसले. मुंबईतील रस्ते कामांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत कट्टर विरोधक एकत्र दिसले. यावेळी आदित्य ठाकरे समोरच्याचं खूर्चीवर बसले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत. याशिवाय, ज्यावेळी एकनाथ शिंदे बैठक हॉलमध्ये आले त्यावेळी तेथील सर्व नेते उभे राहिले. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपली खूर्ची सोडली नाही. ते तसेच बसून राहिले. तथापि, बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहताना दिसले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिले नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement