Adipurush Row: नालासोपारा, पालघर मध्ये 'आदिपुरूष' चा चालू खेळ काही हिंदू संघटनांनी रोखला; बॉलिवूड विरोधात घोषणाबाजी (Watch Video)

देव देवतांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही असं म्हणत काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्स मध्ये राडा घातला आहे.

aadipurush | Twitter and Insta

आदिपुरूष सिनेमा मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. सिनेमाच्या रिलीजनंतरही या सिनेमाशी निगडीत वाद संपलेले नाहीत. सिनेमातील काही दृश्य, संवाद, भाषा यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच प्रभू श्रीराम आणि रामायणाबाबत चूकीच्या गोष्टी दाखवल्या जात असल्याचं सांगत काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार 18 जून ची आहे.(हेही वाचा: Adipurush Dialogues Controversy: आदिपुरुष चित्रपटातील विवादास्पद संवाद बदलले जाणार; Manoj Muntashir यांची माहिती)

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement