Thane Traffic jam: मझा उल्लेख 'चांद्र मोहीमवीर' असा करा; ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अभिनेता Abhijeet Kelkar याचा संताप

अभिनेता अभिजित केळकर यालाही ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. ठाण्यातील रहदारीचा अनुभव घेतल्यानंतर या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Thane Traffic jam: मझा उल्लेख 'चांद्र मोहीमवीर' असा करा; ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अभिनेता Abhijeet Kelkar याचा संताप
Abhijeet Kelkar

ठाणे शहरात रहदारीचा प्रश्न मोठ्या चांगलाच गंभीर झाला आहे. नागरिक, सेलिब्रेटी आणि अनेक लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, नोकरदार वर्ग यांनाही या दैनंदिन समस्येस तोंड द्यावे लागत आहे. अभिनेता अभिजित केळकर यालाही ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. ठाण्यातील रहदारीचा अनुभव घेतल्यानंतर या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेत्याने काय म्हटले पोस्टमध्ये?

... आज शूटिंगचा साडेआठ चा कॉल टाईम होता साडेसात वाजता घरून गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तास घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंप च्या इकडे बंपर टू बंपर ट्रॅफिक मध्ये अडकलो आहे, ट्राफिक कधी सुटणार शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार हे माहीत नाही, ह्या केऑटिक सिच्युएशन मध्ये घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक ड्रायव्हर्स मुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या स्पॉटला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, "अभिनेता" अभिजीत केळकर असा न करता "चांद्र मोहीमवीर" अभिजीत केळकर असा करावा ही विनंती.

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अभिनेता संतापला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)


Share Us