Congress Expels Sanjay Nirupam From Party: संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसची मोठी कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी

काँग्रेस अध्यक्षांनी निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Sanjay Nirupam | (Photo Credit: X)

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्याने पक्षविरोधी वक्तव्ये करत होते. आता त्यांची पक्षातून निलंबन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेसने बुधवारी मंजूर केला. त्याआधी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना बुधवारीच स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबई उत्तर-पश्चिम जागेसह मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर निरुपम यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर निशाणा साधला होता. संजय निरुपम येथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने ते संतापले. खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना येथून तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते.

तत्पूर्वी संजय निरुपम यांनी ट्विट केले होते की, 'ज्या पक्षाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांनी माझ्यासाठी कागद, पेन आणि शक्ती वाया घालवू नये. याचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी व्हायला हवा. मी पक्षाला दिलेली मुदत आज संपत आहे. मी तुम्हाला माझ्या पुढच्या टप्प्याबद्दल उद्या सांगेन.' (हेही वाचा: Hemant Patil and Bhavna Gawali: शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे, भावना गवळी यांचा पत्ता कट, एकनाथ शिंदे यांची 'ठाणे'दारी राहणार?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now