Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून या आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच आरोपीने पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी स्प्रेचा वापर केला होता.

Representational Image (Photo Credits: File Image)

Pune Rape Case: पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवारी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचं भासवून एका 22 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या संशयित पुरूषाला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता पुण्यातील कोंढवा हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून या आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच आरोपीने पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी स्प्रेचा वापर केला होता. त्यानंतर आरोपीने महिलेवर बलात्कार केला.

पुण्यातील बलात्कारातील आरोपीला अटक - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement