Pune Accident Video: अनियंत्रित भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना उडवले,अपघातात सात जण जखमी, गुन्हा दाखल

पुणे शहरातील कोलाड महामार्गावक पिरंगुट येथील घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pune Accident Video

Pune Accident Video: पुणे शहरातील कोलाड महामार्गावक पिरंगुट येथील घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.घाटातील उतारावर सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव टेम्पो अनियंत्रित झाल्याने अपघातात पाच दुचाकी आणि एका कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टेम्पो चालक गोंविंद भालचंद्र लाल याच्यावर पौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाल्याने व्हिडिओ समोर आला आहे. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement