Aaditya Thackeray Car Accident Video: आदित्य ठाकरे यांच्या गाडीला मुंबईत अपघात; कारला दुचाकीने दिली धडक (Watch)
दुचाकी चालकाला शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकीचालक अमित अंझारा याच्याविरुद्ध रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
- Read in
- मराठी
शिवसेना (UBT) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बुधवारी मुंबईतील दादर परिसरात अपघात झाला. दादर परिसरात आदित्य ठाकरे यांच्या एसयूव्हीला एका दुचाकीने धडक दिली. शिवसेना भवनाजवळ झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आदित्य ठाकरे एसयूव्हीमध्ये बसले होते आणि दुसरे कोणीतरी गाडी चालवत होते. मात्र, उजवीकडे वळण घेण्यासाठी वाहनाचा वेग कमी झाल्याने दुचाकीने एसयूव्हीला धडक दिली. एसयूव्हीची धडक बसल्याने 28 वर्षीय दुचाकी चालक जमिनीवर पडला. मात्र, त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.
दुचाकी चालकाला शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकीचालक अमित अंझारा याच्याविरुद्ध रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम 279 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पुढचे 4-5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, बीएमसीचा इशारा)
Maharashtra | Former Maharashtra Minister and MLA Aditya Thackeray's car and bike collided near Sena Bhavan in the Dadar area of Mumbai, no casualties were reported.
Aditya Thackeray's SUV car was hit by a bike. The bike driver was caught and handed over to the Shivaji Park… pic.twitter.com/3eME7xFmxq
— ANI (@ANI) June 28, 2023
सेनाभवनासमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगात येणाऱ्या बाईक स्वाराची धडक, Video pic.twitter.com/qjcg9qL5Bc
— News18Lokmat (@News18lokmat) June 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 11:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

