Pune Accident: रस्ता ओलांडताना तरुणाला भरधाव दुचाकीची धडक, अपघाताचा Video कॅमेऱ्यात कैद

पुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Accident pune PC Twitter

Pune Accident:  पुण्यात रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकीने धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या तरुण रस्ता ओलांडताना ही घटना घडली. या अपघाताची घटना रस्त्याच्या जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना पुण्यातील मगरपट्टा रस्त्यावर घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण रस्त्याचे नियम न पाळता रस्ता ओलांडताना दिसत आहे. समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. धडक इतक्या जोरात होती की, तरुण रस्त्याच्या पुढे फेकला गेला. त्यासोबत दुचाकीस्वार खाली पडला. अपघात पीडित गंभीर जखमी झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now