Vasai Accident: मोटारबाईक आणि कारच्या धडकेत एक जखमी, वसई येथे अपघात

वसई येथे रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळाली.

Vasai Accident: मोटारबाईक आणि कारच्या धडकेत एक जखमी, वसई येथे अपघात
Accident (PC- File Photo)

Vasai Accident:  वसई येथे रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात बाईकवर असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात वसईच्या पश्चिमेच्या बाभोला परिसरात घडला, कार्डिनल ग्रेसेस जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. (हेही वाचा- पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा)

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या मुलाचे नाव अनिकेत कुटीनो आहे. हा जिम मधून घरी दुचाकीवरून जात होता. जिमच्या काही अंतरावर हा अपघात झाला. समोरून चार चाकी गाडी आली आणि ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. दोघांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. कारचे एअरबॅग उघडल्याने कार मधील वाहन चालकाला काहीच झाले नाही. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात झाला अशी माहिती प्रशमदर्शीनी दिली.

या अपघातानंतर परिसरात रात्री खळबळ उडाली होती. जखमीला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तेथे लाईट नसल्याने  अपघात घडून येतात अशी माहिती नागरिकांकडून मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 07:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).