मुंबई विमानतळावर फसवणूक होत असल्याचा दावा करणारा 'तो' व्हायरल व्हिडिओ चुकीचा व दिशाभूल करणारा; BMC ने दिले स्पष्टीकरण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बीएमसीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. विमानतळावर होत असलेल्या चाचण्या व नियमांची अंमलबजावणी ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यूकेमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉलद्वारे लोकांकडून पैसे उकळण्यासाठी 'फसवणूक' केली जात असल्याचा आरोप केला आहे. मनोज लाडवा नावाची व्यक्ती असून तो आपल्या सासरच्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 30 डिसेंबरला मुंबईला पोहोचला होता. परंतु येथील विमानतळ चाचणी केंद्रावर त्यांची कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लाडवा यांच्या म्हणण्यानुसार, लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून उड्डाण घेण्याच्या तीन तास आधी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अशाप्रकारे मुंबई विमानतळावर फसवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बीएमसीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. विमानतळावर होत असलेल्या चाचण्या व नियमांची अंमलबजावणी ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे. समाजमाध्यमांवर ‘व्हायरल' होत असलेला 'व्हिडिओ’ चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. अशाप्रकारे या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
विमानतळावर होत असलेल्या चाचण्या व नियमांची अंमलबजावणी ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार.
समाजमाध्यमांवर ‘व्हायरल' होत असलेला 'व्हिडिओ’ चुकीचा व दिशाभूल करणारा.
तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा महापालिका प्रशासनाचा निर्वाळा. pic.twitter.com/mQB31kuP7d
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 11:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

