Maharashtra School Exam: पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
यापूर्वी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. परंतु, आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra School Exam: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकार असणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. परंतु, आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इयत्ता 5वी आणि 8वी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. (वाचा - Muslim Woman Eligible For Maintenance Under DV Act: घटस्फोटानंतरही मुस्लीम महिला DV कायद्यांतर्गत पालनपोषणासाठी पात्र; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)