Government Renames Port Blair to Sri Vijaya Puram: केंद्र सरकारने बदलले अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअरचे नाव; आता ओळखले जाणार 'श्री विजयपुरम'
सरकारने शुक्रवारी जाहीर केले की अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
Government Renames Port Blair to Sri Vijaya Puram: केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपुरम' करण्याची घोषणा केली आहे. सरकारने शुक्रवारी जाहीर केले की अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम असे करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते.’
ते ओउढे म्हणतात, ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. हे बेट ते ठिकाण आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता आणि वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.’ (हेही वाचा: UNESCO World Heritage Site: आसामच्या Charaideo Maidam चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश; भारतामधील 43 वे स्थळ)
सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपुरम' केले-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)