New Blood Group: तब्बल 50 वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी शोधला MAL नावाचा नवीन रक्तगट; अनेक रुग्णांना होणार फायदा

या रक्तगटाचे नाव एमएएल (MAL) रक्तगट आहे.

Representational Image I (Photo Credit: Pixabay)

New Blood Group: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळे रक्त गट असतात. आत्तापर्यंत प्रामुख्याने 4 प्रकारचे रक्तगट होते, मात्र आता शास्त्रज्ञांनी आणखी एक रक्तगट शोधून काढला आहे. या शोधामुळे अनेक आजारी लोकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. या नवीन वैद्यकीय संशोधनासाठी 50 वर्षांहून अधिक काळ लागला. शास्त्रज्ञांना या नवीन आणि दुर्मिळ रक्तगटाची माहिती होती, पण त्याचा फायदा कसा होईल, हे अद्याप निश्चित करणे बाकी होते, जे आता निश्चित केले गेले आहे.

हा रक्तगट एनएचएस रक्त आणि प्रत्यारोपण (NHSBT) च्या संशोधकांनी ओळखला आहे. या रक्तगटाचे नाव एमएएल (MAL) रक्तगट आहे. संशोधकांनी एमएएल नावाच्या या नवीन रक्तगट प्रणालीचा भाग म्हणून AnWj प्रतिजन ओळखले आहे. एमएएल ही 47 वी ज्ञात रक्त गट प्रणाली आहे. शास्त्रज्ञ या रक्तगटावर व्यापक संशोधन करत होते, त्यानंतर अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. हा रक्तगट 1972 साली प्रथम दिसला होता. ज्या लोकांचा रक्तगट दुर्मिळ आहे, या नवीन रक्तगटामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. अशा रुग्णांसाठी औषधेही सहज बनवता येतील. याआधी 1972 मध्ये, एका गर्भवती महिलेच्या रक्ताच्या नमुन्यात एक विचित्र विसंगती दिसून आली होती. त्यावेळी हा रक्तगट ओळखला गेला नव्हता. त्यानंतर यावावर संशोधन सुरु झाले व आता 50 वर्षानंतर नवी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा: New XEC COVID Variant: जगभर पसरतोय कोविडचा नवा व्हेरिएंट; जाणून घ्या त्याची लक्षणं, धोकादायक किती?)

शास्त्रज्ञांनी शोधला MAL नावाचा नवीन रक्तगट-