How To Beat The Heat: उष्माघाताचा धोका टाळा! 'ही' लक्षणे दिसल्यास घ्या वैद्यकीय सल्ला

उष्माघातावर तात्काळ उपाय करणं आवश्यक असतं. यावर उपचार न केल्यास ते तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना इजा करू शकते.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

How To Beat The Heat: हीटस्ट्रोक ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीला खूप वेळ अति उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने उद्भवू शकते. ही समस्या शरीराच्या अतिउष्णतेमुळे उद्भवते, सामान्यतः गरम तापमानात दीर्घकाळ राहिल्याने किंवा शारीरिक श्रमामुळे उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो. तुमच्या शरीराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढल्यास तुम्हाला ही समस्या होऊ शकते. ही स्थिती उन्हाळ्याच्या महिन्यांत सर्वात सामान्य आहे. उष्माघातावर तात्काळ उपाय करणं आवश्यक असतं. यावर उपचार न केल्यास ते तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना इजा करू शकते. तसेच उपचारास उशीर झाल्यास याचा परिणाम अधिक तीव्र असू शकतो. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

उष्माघाताची लक्षण -

उष्माघात झाल्यास शरीरात ताप येणे, त्वचा लाल होणे, कोरडेपणा, उष्ण, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता, अति घाम येणे, मूर्च्छा येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now