Misal Pizza Recipe: पिझ्झा हा जगातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मिसळ पिझ्झाची रेसिपी दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ आदित्य गुजर नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याने म्हटल आहे जर तुम्ही मिसळ पिझ्झा खाल्ला नसेल तर तुम्ही @bappamisal_nigdi_ येथे तो खाऊ शकता. हा पिझ्झा अतिशय चटकदार, मसालेदार आणि स्वादिष्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मिसळ पिझ्झाची स्पेशल थाळी 110 रुपयांत आणि नॉर्मल थाली 50 रुपये असल्याचंही त्यांने म्हटलं आहे. फूड ब्लॉगरने या मिसळ पिझ्झा शॉपचा पत्ताही पोस्टमध्ये सांगितला आहे. सध्या सोशल मीडियावर मिसळ पिझ्झाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: तुम्ही कधी Rasgulla Idli खाल्ली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही रेसिपी पाहून तुम्हीही म्हणालं, क्या दिमाग लगाया है यार... Watch)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)