'Umangmalaj' Janmotsav: उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अर्पण केले 1,100 नारळ (Video)

पहाटे 3.30 वाजता ब्राह्मणस्पती सूक्ताचे पठण झाल्यावर जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. पहाटे 4 ते 6 या वेळेत गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचा स्वराभिषेक झाला.

Dagdusheth Halwai Ganpati,

'उमांगमलज' जन्मोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 1100 नारळ अर्पण करण्यात आले. या जन्मोत्सवात नारळ अर्पण करण्याचे मोठे महत्त्व आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंदिराला नारळांनी सजवण्यात आले असून, पहाटे 3.30 वाजता ब्राह्मणस्पती सूक्ताचे पठण झाल्यावर जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. पहाटे 4 ते 6 या वेळेत गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचा स्वराभिषेक झाला, त्यानंतर सकाळी 8 वाजता गणेश याग, त्यानंतर आरती करण्यात आली.अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना उमांगमलज म्हणतात. (हेही वाचा: Pandharpur Vitthal Rukmini Darshan: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपूर मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं 24 तास दर्शन)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement