Navratri Colors 2021 Day 5: नवरात्रीचा पाचवा दिवस! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल

उद्या नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते,

Navratri Colors 2021 Day 5: नवरात्रीचा पाचवा दिवस! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल
Navratri 2021 Day 5 (File Photo)

7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्‍याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच पाचवा  दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या  दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नव दुर्गा मध्ये स्कंदमाता पाचवी दुर्गा मानली जाते.या देवीला चार हात आहेत, तिच्या दोन हातात कमळाचे फूल आहे,एका हातात स्कंददेव बाळाच्या रूपात बसलेले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2021 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).