Shivrajyabhishek Sohala: ‘शिवराज्याभिषेक महोत्सव’ भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवण्याचे राज्य सरकारचे आवाहन; जाणून घ्या कुठे कराल मेल

शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज (फोटो सौजन्य-फेसबुक)

पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनकाळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे. यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचवावा आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सरकारने min.culture@maharashtra.gov.in या ई-मेलवर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now