Ramabai Ambedkar Punyatithi 2023: रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आदरांजली

मुंबई मध्ये रमाबाई आंबेडकर यांचे 27 मे 1935 दिवशी राहत्या घरी दीर्घ आजारपणातून निधन झाले होते.

(Ramabai Ambedkar- फोटो सौजन्य - wikimedia commons)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे. आंबेडकर अनुयायी त्यांना 'रमाई' म्हणून संबोधतात. आंबेडकर बॅरिस्टर होऊन इंंग्लंडला गेले असले तरीही त्याच्या पश्चात मुंबई मध्ये राहिलेल्या रमाबाईंना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत जीवन व्यतित करावे लागले होते. काबाडकष्ट केलेल्या रमाईंची प्रकृती ढासळत त्यांचे 27 मे 1935 दिवशी दादरच्या 'राजगृह' मध्ये निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी रमाईंना आदरांजली अर्पण केली आहे.

पहा ट्वीट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement